माझ्या मनी न होते
तेव्हा तुझे बिलगणे
तेव्हा तुझे बिलगणे
उन्मत्त प्राण माझा
तेव्हा तुझे विलगणे
तेव्हा तुझे विलगणे
ठरवून काहि करणे:
आधीच विझुनि जाणे !
आधीच विझुनि जाणे !
यांत्रीक बद्धतेने
शरिरास शरण जाणे.
शरिरास शरण जाणे.
पाऱ्यास पकडण्याचा
तो मूढ हट्ट होता
तो मूढ हट्ट होता
चैतन्य बांधण्याचा
सौदेबझार होता !
सौदेबझार होता !
ग र जोग
No comments:
Post a Comment